मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या निकालाआधीच अनेक राजकीय पक्षांनी विजय मिरवणुकांची तयारी सुरु केली आहे. मात्र, मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सर्वच राजकीय पक्षांना दणका दिला आहे. १८ मे नंतर विजयी मिरवणुका काढा असे त्यांनी बजाविले आहे.
विजयी मिरवणुका काढा;पण १८ मेनंतर !
देशात सर्वत्र लोकसभा निवडणूकांसाठी मतदान झाले असून, १६ मे रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे. मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजानुसार सध्या आघाडीवर असलेल्या राजकीय पक्षांनी विजयी झाल्यानंतर काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांची तयारी सुरु केली आहे.
मात्र, मुंबई पोलिसांनी निवडणुकीतील विजयानंतर मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारली आहे. निकालाच्या दिवशी कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही, असे मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारीया यांनी जाहीर केले आहे.