राजस्थानपुढे दिल्लीचे आव्हान

rajsthan

अहमदाबाद- आयपीएल स्पमर्धेत पहिल्या तीन संघामध्ये स्थान मिळविण्याासाठी राजस्थाच्या संघाला दिल्ली डेअर डेविल्स विरुध्दच्या सामन्या‍त विजय आवश्याक आहे. राजस्थानला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यांचे तिसरे स्थान कायम राहिले आहे. त्यामुळे स्थान कायम टिकवून ठेवण्यासाठी या सामन्यात राजस्थानला विजय आवश्यक आहे.

यावेळेसच्या आयपीएल स्पार्धेत भारतात आल्यापासून दिल्लीच्या संघाला सलग पाच पराभव स्वीकारावे लागले आहेत. त्यामुळे या सामन्यात राजस्थान संघाचे पारडे जड आहे.या दोन संघांमध्ये ३ मे रोजी झालेल्या लढतीत राजस्थानने दिल्लीला सहज नमवले होते. ते पाहता तो आत्मविश्वास राजस्थानला मिळणार आहे. मात्र चेन्नईविरुद्धच्या पराभवातून ते नक्कीच धडा घेतील.

राजस्थानने काही बदल केले आहेत.सध्या तरी वॉटसनने सलामीला येण्याचा प्रयोग सध्यातरी योग्य आहे. याउलट अंकितने हंगामातील पहिलीच लढत खेळताना प्रभावी फलंदाजी केली. यास्थितीत आता अजिंक्य रहाणे, करुण नायर, स्टुअर्ट बिन्नी, स्टीवन स्मिथ, जेम्स फॉकनर या फलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरीची राजस्थानला अपेक्षा आहे. यष्टिरक्षक संजू सॅमसनला चेन्नईविरुद्ध वगळण्याचा निर्णय मात्र राजस्थानला महागात पडला. प्रवीण तांबे, फॉकनर यांचा समावेश असलेली राजस्थानची गोलंदाजी ही मात्र चिंतेचा विषय नाही.

दिल्लीचा कर्णधार केव्हिन पीटरसन फक्त कर्णधार म्हणूनच नाही तर मोठी खेळी करण्यातही अपयशी ठरत आहे. क्षेत्ररक्षणातही दिल्लीने मंगळवारी बंगलोरविरुद्ध असंख्य चुका केल्या. त्या सर्वाला जेपी डुमिनी आणि केदार जाधव अपवाद आहेत. जाधवला वरच्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय आतातरी दिल्ली घेईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment