महिला बँकेची नन्ही कली योजना

bmb
राष्ट्रीय महिला बँकेने खास मुलींसाठी नन्ही कली रिकरिंग योजना सादर केली आहे. यामध्ये १ दिवसाच्या नवजात मुलीपासून ते १३ वर्षाच्या मुलीपर्यंत रिकरिंगचे खाते उघडता येणार आहे. किमान ५० रूपये भरून हे खाते सुरू करता येणार आहे. त्याची मुदत ३ वर्षांपासून १० वर्षांपर्यंत आहे.

सर्वसाधारण रिकरिंग योजनात ज्या तारखेला पहिला हप्ता भरला असेल त्याच तारखांना पुढचा हप्ता भरावा लागतो. मात्र नन्ही कली योजनेत महिन्यात कोणत्याही तारखेला हा हप्ता भरता येणार आहे. शिवाय गरज पडल्यास जमा रकमेच्या ८५ टक्के रक्कम कर्जावू घेता येणार आहे. भविष्यात व्याज दर बदलले तरी या योजनसाठी निश्चत केलेल्या व्याजदरात बदल केला जाणार नाही. त्याचबरोबर दुर्घटना विम्याचा लाभही खातेधारकाला मिळणार आहे.

Leave a Comment