नवी दिल्ली – एक दुर्लभ मुघलकालीन हाराचा बुधवारी क्रिस्टीद्वारा जिनिव्हात लिलाव केला जाणार आहे. या हारावर मुघल बादशाह अकबर आणि जहांगीरच्या नावाचे उत्कीर्ण आहेत. क्रिस्टी बुधवारी जगातील सर्वात मोठय़ा दोषरहित निळ्या हिऱयाचाही लिलाव करणार आहे. लिलावात एकूण 8 कोटी अमेरिकी डॉलरची विक्री होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.
जगातील सर्वात मोठय़ा हिऱयाचा लिलाव जिनिव्हात होणार
`मॅग्नीफिशंट ज्वेल्स’ विक्री लिलावात 17 व्या शतकातील 7 मुघलकालीन कंठहार आहेत, ज्यावर मुघल बादशाहांची नावे कोरलेली आहेत. यांची किंमत 1,50,000 ते 20,00,000 अमेरिकी डॉलर्स एवढी गृहीत धरण्यात आली आहे. मुघल बादशाह त्यांच्या रत्नांच्या आवडीबाबत ओळखले जायचे. मुघलांचा पूर्वज तिमूरिदच्या जमान्यापासून या दागिन्यांवर नाव कोरण्याची परंपरा सुरु झाली. ते हीरे आणि अन्य किमती पदार्थांवर आपली नावे उत्कीर्ण करत असत, ज्यांना ते आपल्या मोठय़ा कंठहारांमध्ये पसंत करत असत. एकीकडे ही रत्ने साम्राज्याची समृद्धी आणि शानचे प्रतीक असायची, तर मुघलांद्वारा याला रक्षा कवच देणाऱया ताबीजांच्या रुपातदेखील एकत्रित केले जात होते.
कतारस्थित इस्लामिक कला संग्रहालयात एक महत्त्वपूर्ण हार प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्यात 11 मुघलकालीन रत्ने जडलेली आहेत. याचे एकूण वजन 877.23 कॅरेट एवढे आहे. या रत्नांपैकी 3 रत्नांवर बादशाह जहांगीर आणि एकावर शहंशाह शाहजहां यांचे नाव कोरलेले आहे.`मॅग्नीफिशंट ज्वेल्स’मध्ये जगातील सर्वात मोठय़ा दोषरहित निळ्या हिऱयाचाही लिलाव होणार आहे. `द ब्लू’ नावाच्या या हिऱयाची किंमत 2,10,00,000 ते 2,50,00,000 अमेरिकी डॉलर एवढी गृहीत धरण्यात आली आहे.