उथप्पाच्या खेळीमुळे मुंबई पराभूत

uthppa

मुंबई- आयपीएल स्पर्धेतील मुंबई विरूध्दच्या सामन्यात कोलकत्ताच्या रॉबिन उथप्पाने दमदार फलंदाजी करताना ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५२ बॉल्सामध्ये ८० धावा ठोकल्या. त्याच्या या दमदार खेळीमुळे कोलकत्ताने मुंबईवर सहा विकेट आणि 8 बॉल्स राखून पराभव केला. मुंबईच्या या पराभवामुळे आयपीएलच्या सातव्या मोसमातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

या सामन्या्त प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने ५ विकेट १४१ रन्स केले होते. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्माने ४५ बॉल्समध्ये ५१ रन्स केले होते. अर्धशतकी खेळी साकारताना दोन सिक्स आणि चार फोर ठोकले. त्यां नतर मुंबईच्याि अंबाती रायुडूने २७ बॉल्समध्ये तीन फोर व एका सिक्स मारत ३३ रन्स केल्या. या दोघांच्या फलंदाजीमुळे मुंबईला १४१ धावा करता आल्याो.

मुंबईच्या १४१ धावांचे आव्हान घेवून मैदनात उतरलेल्याा कोलकत्याच्या् रॉबिन उथप्पाने इंगा दाखवताना ९ चौकार आणि १ षटकाराच्यात मदतीने ५२ बॉल्सनमध्येल ८० धावा ठोकल्या. त्याच्या या दमदार खेळीमुळे मुंबई इंडियन्सला पराभूत करीत कोलकाता नाइट रायडर्सला विजय साजरा करता आला. पराभवाचे नैराश्य मुंबई संघातील खेळाडू लपवू शकले नाहीत. दहा सामन्यांपैकी सात सामन्याात पराभव पत्करणारा हा संघ सहा गुणांसह गुणतालिकेत शेवटून दुस-या स्थानावर आहे. आयापीएल स्पबर्धेतील या संघाचे आव्हान संपल्यात जमा आहे.

Leave a Comment