आता कपड्यात ठेवा वॉशिंग मशीन

luna
मळलेले कपडे स्वच्छ करण्यासाठी घरोघरी वॉशिंग मशीनचा वापर वाढला आहे. कपडे मशीन मध्ये टाकून बटण दाबले की कपडे वाळवूनच बाहेर काढण्याची ही सोय सर्वसामान्य माणसांच्याही चांगलीच अंगवळणी पडली आहे. मात्र कपडे मशीनमध्ये टाकण्याऐवजी कपड्यातच मशीन ठेवले तर? ही कल्पना हास्यास्पद वाटेल. पण असे मशीन एका कोलंबियन विद्यार्थ्याने तयार केले आहे.

ल्यूना नावाचे हे मशीन म्हणजे एक इलेक्ट्रोनिक वॉशिग बॉल असून हा कपड्यात ठेवता येतो. यासाठी लागणारे पाणी, वीज अगदी कमी लागते हा त्याचा आणखी महत्त्वाचा फायदा. हा बॉल तयार करणारा ज्युआन कॅमिलो व्हिलामिझार कोलंबिया पॉटिफिशिया बोलव्हिॅरिआना विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तो सांगतो हा ल्यूना बॉल लाँड्री बास्केटमध्ये ठेवायचा आहे. या बॉलमध्ये थोडे पाणी भरलेले आहे. या बॉलच्या धातुच्या पृष्ठभागावर असलेल्या छिद्रातून इलेक्ट्रोनिकली चार्ज असलेल्या वाफेचा ढग कपड्यांवर सोडला जातो. या बॉलच्या व्हायब्रेशनमुळे कपडे हलविले जातात आणि त्यातील मळ बाहेर काढला जातो.

कपड्यातील मळ काढल्यानंतर बॉलमधून येणार्‍या गरम हवेमुळे कपडे कोरडे होतात. या पद्धतीने कपडे धुण्यासाठी पाणी कमी लागतेच पण वीजेचा खर्च येत नाही. तसेच कपड्यांचे धागे कमकुवत होत नाहीत. त्यामुळे कपडे अधिक टिकतात असा त्याचा दावा आहे.