अधिकारी कर्मचार्‍यांच्या राजीनाम्यांमुळे इन्फोसिस अडचणीत

infosys_0
आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिस पुढे गेल्या काही दिवसांत अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कंपनी सोडल्यामुळे संकट निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम कंपनीच्या महसूलावर होत आहे.१०० अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या इन्फोसिस मधून गेल्या कांही महिन्यात अनेक वरीष्ठ अधिकारी आणि व्यंवस्थापन तज्ञ बाहेर पडले आहेत. गेल्या कांही वर्षात कंपनीने म्हणावी तशी वेतनवाढ दिलेली नाही यामुळे अनेक कर्मचारीही दुसर्या् कंपन्यांमध्ये जॉईन झाले आहेत. याचा विपरित परिणाम कंपनीच्या महसूलावर झाला आहे. मार्च १४ अखेर कंपनीचा महसूल २४.२ टक्यांनी घटला असल्याचे सांगितले जात आहे.

कर्मचार्‍यांनी कंपनी सोडण्याचे प्रमाणही १८.७ टक्कयांवर आले आहे आणि दरवर्षी सरासरी एक पंचमांश कर्मचारी कंपनी सोडत आहेत. कॅम्पस इंटरव्हू मधून निवडले जाणारे फ्रेशर्सही इन्फोसिस जॉईन करण्यास फारसे उत्सुक नसल्याचा अनुभव येत असल्याचेही सांगितले जात आहे. वास्तविक इन्फोसिस सर्वोत्तम ट्रेनिंग सेंटर म्हणून फ्रेशर्स प्राधान्याने निवडत असत. मात्र गेल्या २-३ वर्षात कंपनीचे हे रेप्युटेशनही कमी झालेले दिसून येत आहे.

कंपनी कर्मचार्‍यांनी सोडून जाऊ नये यासाठी विशेष प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून एप्रिलमध्ये ६ ते ७ टक्के पगारवाढ दिली गेली आहे. मात्र त्याचाही फारसा चांगला परिणाम झालेला नसून कर्मचारी टिकवून कसे धरायचे ही चिंता कंपनी व्यवस्थापनाला सतावते आहे.

Leave a Comment