सोने चांदी तारण ठेवून ७५ टक्केच कर्ज मिळणार

goldloan
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नव्या निर्देशांनुसार सहकारी बॅकंतून सोने चांदी तारण ठेवून दिल्या जाणार्‍या कर्जाची रक्कम सोने चांदीच्या किमतीच्या ७५ टक्कयांपेक्षा अधिक असू शकणार नाही. हे कर्ज देताना मागील ३० दिवसांतील सोने चांदी भावाची सरासरी काढून त्यानुसारच कर्जाची रक्कम ठरविता येणार आहे.

दागिने तारण ठेवून कर्ज काढण्याची प्रवृत्ती कमी व्हावी तसेच सोन्या चांदीचे दर वरखाली होत असल्याने कर्ज देऊन बॅकांचेही नुकसान होऊ नये यासाठी हे नवे नियम ठरविले गेले आहेत. त्यानुसार ज्याला कर्ज हवे असेल त्याने आणलेल्या दागिन्याचे मूल्यांकन इंडिया बुलीयन अॅन्ड ज्युवेलर्स असोसिएशन च्या किमतींच्या आधारवर ठरवायचे आहेत. प्रत्येक बॅकंने ठरविण्याच्या दरात समानता असावी म्हणून आरबीआयने मूल्यमापन प्रक्रियेसाठी नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार सोने तारण कर्ज देताना २२ कॅरेट सोन्याचा भाव गृहित धरला जाणार आहे. मात्र त्यापेक्षा कमी कॅरेटचे सोने असेल तर त्यानुसार भाव ठरविले जाणार आहेत.

Leave a Comment