संगणक वापराखेरीज आज रोजचा दिवस जाणे बहुसंख्य लोकांना अशक्य बनले आहे. मात्र संगणक वापरासाठीही हातांचा वापर करावा लागतो आणि बोटांच्या हालचाली करून बोटे थकूनही जातात. मायक्रोसॉफ्टने आता असा एक की बोर्ड विकसित केला आहे की ज्यामुळे की बोर्डला बोट न लावताही तुमचा संगणक ऑपरेट करता येणार आहे.
बोटांच्या इशार्यावर चालणार कॉम्प्युटर
मायक्रोसॉफ्ट रिसर्च टीमने हा मॅकॅनिकल की बोर्ड विकसित केला आहे. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यासाठी की बोर्डच्या वर धरून तुम्ही नुसता हात हलवायचा की हाताच्या इशार्यानुसार संगणक काम करेल. ऑगमेंटेड मॅकॅनिकल की बोर्ड असे त्याने नांव असून ते सेंसिटिव्ह की बोर्ड आहे. की बोर्डच्या पृष्ठभागावर अथवा आसपास कोणतीही हालचाल झाली तरी हा की बोर्ड ती हालचाल टिपतो. त्यानुसार संगणक ऑपरेट केला जातो. यामुळे बोटांना पूर्ण आराम मिळतो असे त्यांचे म्हणणे आहे.