पाकिस्तान धोकादायक देश बनण्याच्या प्रक्रियेत अग्रेसर

pakistan_13
इस्लामाबाद – येथील मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार पाकिस्तानातील स्थिती सतत बदलत असून पाकिस्तान सर्वात धोकादायक देश बनण्याच्या प्रक्रियेत अग्रेसर आहे. आयोगाच्या 2013 च्या साडेतीनशे पानांच्या अहवालानुसार येथील धार्मिक अल्पसंख्यांक आणि पत्रकारांसाठी पाकिस्तान धोकादायक बनत आहे. जातीय आणि धार्मिक हिंसाचारात 2013 या वर्षात 687 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या संपूर्ण वर्षात ख्रिश्चन, हिंदू याच्यासह मgिस्लमांवर अनेक वेळा प्राणघातक हल्ले झाले आहेत. तसेच 11 पत्रकारांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामूळे देशातील पत्रकार असूरक्षीत असल्याचे अहवालात म्हटले आहे. असे असून सुध्दा पाकिस्तानच्या कोणत्याही अधिकाऱयांनी या अहवालाबद्दल कोणतीही टिप्पणी केलेली नाही.

Leave a Comment