आयकर विभागाची राष्ट्रवादी काँग्रेसला बेनामी देणग्या प्रकरणी नोटीस

incometax
मुंबई – देशातील शेवटच्या टप्प्याचे मतदान होत असतानाच सोमवारी आयकर विभागाने राष्ट्रवादी काँग्रेसला बेनामी देणगी प्रकरणी नोटीस बजावली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात मिळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यात जमा झालेल्या देणग्यांमध्ये 20 कोटी 75 लाख रुपयांची रक्कम कोणाकडून आली, हा दानशूर कोण? याचा छडा लागत नसल्याने आयकर विभागाने ही नोटीस पाठवली आहे.

गेल्या काही वर्षात राष्ट्रवादीच्या खात्यात जमा झालेल्या 61 कोटी 56 लाख रुपयांपैकी 34 कोटी 75 लाख रुपयांच्या रकमा देणगी स्वरुपात होती. याच दरम्यान 20 कोटी 75 लाख रुपयांची पॅन नंबर नसलेली देणगी राष्ट्रवादीच्या खात्यात जमा झाल्याने आयकर खात्याने राष्ट्रवादीला नोटीस पाठविली आहे. येत्या 15 दिवसात याबाबत पक्षाने खुलासा करावा अन्यथा संबंधित रकमेवर कर भरावा तअसे या नोटिशीत म्हटले

Leave a Comment