राजस्थानने केली बेंगळरूवर मात

ipl2231232

बेंगळुरू – आयपीएलच्या स्परर्धेत राजस्थान रॉयल्सने दमदार फलंदाजी करताना अटातटीच्या् लढतीत बेंगळुरू संघाचा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने दिलेले १९१ धावांचे लक्ष्य राजस्थान रॉयल्स संघाने १८.५ षटकांत ५ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. राजस्थान रॉयल्सच्या या विजयाने युवराजसिंगची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ ठरली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बेंगळुरूची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार विराट कोहली अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. यानंतर महाराष्ट्राच्या विजय झोलला तिस-या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली. आयपीएलमधील हा त्याचा पहिलाच सामना होता. गेल- झोल जोडीने ३२ धावांची भागीदारी रचली. मात्र, ही जोडी एकापाठोपाठ माघारी परतल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची ८.१ षटकांत ३ बाद ४० अशी स्थिती झाली होती. यानंतर युवराजने अब्राहम डिव्हिलियर्ससोबत चौथ्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी केली. युवी, डिव्हिलियर्स एकापाठोपाठ बाद झाले. डिव्हिलियर्सने ३२ चेंडूंत १ चौकार व ५ षटकारांसह ५८ धावा केल्या. २० षटकात १९१ धावा केल्याच.

राजस्थाेन रॉयल संघाने आव्हा३नाचा पाठलाग करताना युजवेंद्र चहलने अजिंक्य रहाणेला बाद केले. यानंतर युवराजसिंगने शेन वॉटसन, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन आणि करुण नायर या चौघांना माघारी पाठवले. त्यामुळे राजस्थान रॉयल्सची १३.३ षटकांत ५ बाद १०६ अशी स्थिती झाली होती. यानंतर स्टिव्हन स्मिथ आणि जेम्स फॉल्कनर या जोडीने ३२ चेंडूंत नाबाद ८५ धावांची भागीदारी रचून राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला. स्मिथने २१ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४८, तर जेम्स फॉल्कनरने १७ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या. या विजयामुळे राजस्थातन रॉयलच्या. अपेक्षा उंचावल्याच आहेत.

Leave a Comment