भारतीय हिरव्या मिरचीवर सौदीत बंदी

chillis
युरोपियन युनियनने भारतीय हापूस आंबा व अन्य चार भाज्यांवर कीडनाशके आढळल्याने वीस महिन्यांची बंदी घातल्याची घटना ताजी असतानाच आता सौदी सरकारने भारतीय हिरव्या मिरचीवर याच कारणासाठी आयात बंदी घातली आहे. ही बंदी ३० मे पासून अमलात येणार आहे. सौदी हा भारतीय ताज्या भाज्या आयात करणारा पाच नंबरचा मोठा देश आहे.

सौदी सरकारने भारतीय शिपमेंटच्या चाचणीत हिरव्या मिरच्यांवर धोकादायक प्रमाणात किडनाशके आढळल्याचे कारण देऊन ही बंदी घातली आहे. गुंटरचे मिरची व्यापारी शिवकुमार यांच्या मते मात्र भारतीय हिरव्या मिरचीची निर्यात जास्त होत नाही त्यामुळे येथील बाजारात भाव कमी होण्याची शक्यता धुसर आहे. भारतीय दूतावासातील वाणिज्य सचिव सुरिंदर भगत यांनी या बंदीबाबत सौदी कृषी मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment