बिल गेट्स जगातील पहिला महापद्मधीश होणार

billgates
जोहान्सबर्ग – 79.5 अब्ज डॉलर रकमेचा मालक व माइक्रोसॉफ्ट कंपनीचा संस्थापक बिल गेट्स हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जातो. आर्थिक धुरीणांच्या मते अब्जाधीश ही पदवी मागे टाकून बिल गेट्स भावी काळात जगातील पहिला `महापद्माधीश’ ठरण्याची शक्यता आहे. येत्या पंचवीस वर्षांच्या काळात आर्थिक क्षेत्रात महापद्माधीश दिसण्याची शक्यता बॉब लॉर्ड या करविषयक अमेरिकन वकीलाने व्यक्त केली. 2039 च्या मानाने हा बदल होण्याची शक्यता त्याने बोलून दाखविली.
`क्रेडिट सुइसीज’ या बँकिंग क्षेत्रातील नामवंत संस्थेने आपल्या अहवालात असे म्हटले आहे, की अतिश्रीमंत व्यक्तीबाबत केलेला अंदाज खरा ठरल्यास अब्जाधीश हा शब्द सर्वसामान्य ठरणार आहे. त्या ठिकाणी काही महापद्मधीशांचा उदय होईल.

Leave a Comment