चीन अमेरिकेदरम्यान १३ हजार किमीची रेल्वेलाईन

china2
चीनहून थेट अमेरिकेला जाण्यासाठी १३ हजार किलोमीटरची रेल्वे लाईन बांधण्याचा विचार चीन सरकार करत असून हा सारा खर्च करण्याची तयारीही सरकारने दाखविली आहे. या मार्गावर ३५० किमी वेगाने जाणार्यान सुपरफास्ट रेल्वे धावतील व हे अंतर दोन दिवसांत पार करता येईल असे सांगितले जात आहे. हा मार्ग प्रत्यक्षात आला तर जगातील तो सर्वाधिक लांबीचा रेल्वे मार्ग ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा मार्ग सायबरेरिया, बेरींग खाडी पार करणार आहे. रशिया आणि अलास्का यांना जोडणारी ही खाडी पार करण्यासाठी समुद्राखालून २०१ किमीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. अर्थात चीन सरकारने या रेल्वेमार्गाच्या उभारणीची तयारी केली असली तरी अमेरिका, रशिया आणि कॅनडा सरकारकडून त्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. चीनमधून अमेरिकेला जाण्यासाठी विमानप्रवास करणार्‍यांसाठी हा चांगला पर्याय असू शकेल असे चीन सरकारचे म्हणणे आहे.

चीनमध्ये हायस्पीड रेल्वे नेटवर्क उभारणीचे काम सध्या जोरात सुरू असून त्या अंतर्गतच हा मार्ग बांधला जाणार असल्याचे समजते.

Leave a Comment