उन्हाळ्यातली मजा; त्वचेची सजा

skin
उन्हाळ्यात सुट्टया असल्या म्हणजे पर्यटन आणि आऊटिंग या गोष्टी अपरिहार्य ठरतात. कडक उन्हात फिरल्याने केस पांढरे होतात, रखरखीत होतात. त्याबरोबर त्वचाही काळी पडायला लागते. मग त्यासाठी निरनिराळ्या प्रकारची लोशन्स् आणि क्रिम्स् वापरली जातात. पण अशा प्रकारची क्रिम्स् आणि सनस्क्रिन पुरेसे आहेत का असा प्रश्‍न पडतो. म्हणजे अनेक प्रकारची क्रिम्स् लावूनसुध्दा काही वेगळी काळजी घ्यावी लागते.

चेहरा – चेहरा सूर्यप्रकाशात फार वेळ राहिला की चेहर्‍यावर रॅशेस येतात. काही काही लोकांना तर अती सूर्यप्रकाशामुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते. तेव्हा त्यावर उपाय म्हणजे सनस्क्रिन वापरणे. तसा अनेक लोक वापरत असतातही पण एक दक्षता घेतली पाहिजे की, घराच्या बाहेर पडण्यापूर्वी अर्धातास सनस्क्रिन चेहर्‍याच्या काळ्या पडू पाहणार्‍या भागावर चांगलेच चोळून लावले पाहिजे. उन्हाळ्यात दर दोन तासांनी चेहर्‍याला हे क्रिम लावणे सोयिस्कर असते.

केस – उन्हापासून केसाला काही त्रास होऊ नये यासाठी जाड हॅट वापरली पाहिजे. मात्र हॅट वापरायची नसेल तर केसाचे उन्हापासून संरक्षण करण्याचे कापड अवश्य बांधले पाहिजे.

डोळे – डोळ्याला त्रास होऊ नये यासाठी गॉगल आवश्यक असतो. मात्र गॉगल विकत घेताना केवळ फॅशन म्हणून विकत घेऊ नये. डोळ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून घ्यावा. उन्हात फार फिरल्यास डोळे लाल होतात. हा त्रास होऊ नये म्हणून गॉगल विकत घेताना वेगळी दक्षता घ्यावी लागते. सर्वात मोठी दक्षता म्हणजे गॉगलची खरेदी रस्त्यावरच्या फेरीवाल्याकडे न करणे.

शरीर – उन्हामध्ये फिरताना फार घाम येणे हे त्वचेला चांगले नसते. काही वेळा तर जो भाग झाकला जातो त्यावरही रॅशेस येतात. तेव्हा सच्छिद्र कपडे वापरणे चांगले. दररोज डोक्यावरून आंघोळ करावी आणि सर्वात महत्त्वाचे दिवसभरातून सात ते आठ ग्लास पाणी प्यावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment