अश्ववर्षात मुले जन्मास घालण्याची चीनमध्ये लगबग

horseyear
चीनमध्ये वर्षांचे नामकरण प्राण्यांवरून केले जाण्याची प्रथा आहे. यंदाचे वर्ष अश्ववर्ष असून हे वर्ष अतिशय भाग्याचे समजले जाते. यामुळे या वर्षात आपले मूल जन्माला यावे अशी प्रत्येक चिन्याची इच्छा असते. तरूण जोडपी यासाठी कामास लागली असून याच वर्षात आपले मूल जन्मावे यासाठी प्रयत्नशील झाली आहेत. या वर्षात जन्मणारे मूल भाग्यवंत समजले जाते.

या वर्षात मुलाचा जन्म शक्य नसेल तर २०१५ मध्येही तो होऊ नये अशीही येथील जोडप्यांची इच्छा आहे. कारण पुढील वर्ष हे शीप इअर म्हणजे बकरी वर्ष आहे. बकरी वर्ष चांगले मानले जात नाही. बकरीचा वापर बळी देण्यासाठी करण्याची प्रथा असल्याने या वर्षात जन्मलेले मूल नेता होऊ शकत नाही तर जन्मभर फॉलोअरच राहते असाही समज आहे. त्याचे लग्न मोडते, व्यवसायात अपयश येते असाही समज असून या वर्षात जन्मलेल्या १० मुलात एखादेच नशीबवान ठरते असेही सांगितले जाते.

चीनमधील प्रसूतीतज्ञांनीही गरोदर स्त्रिया मोठ्या प्रमाणावर तपासणीसाठी येत असल्याचे सांगितले आहे. या वर्षात जन्मदर जसा वाढेल तसाच गर्भपाताचे प्रमाणही मोठे राहिल असे त्यांचे म्हणणे आहे. कारण ज्यां गरोदर स्त्रियांना या वर्षात मुलाचा जन्म होणे शक्य नाही हे लक्षात येईल त्या पुढील वर्षात जन्म होऊ नये म्हणून गर्भपात करण्यास प्राधान्य देतील असा त्यांचा अनुभव आहे. अनेकांनी पूर्ण दिवस भरण्याच्या अगोदरच शस्त्रक्रिया करून मुलाला जन्म देता येईल काय याचीही विचारणा सुरू केली असल्याचेही डॉक्टर सांगतात.

चीनमध्ये असलेली ही अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी सरकारी पातळीवरही सतत प्रयत्न केले जात आहेत मात्र त्याला म्हणावे तसे यश आलेले नाही असे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment