हैदराबाद-राजस्थान आमने-सामने

hydrabad
अहमदाबाद- आयपीएलच्या या भागात हैदराबाद सनरायझर्ससची कामगिरी म्हणवी तशी होत नाही. सुरुवातीच्या सहा सामन्यातून हैदराबादच्या संघाला केवळ दोन सामन्यातच विजय मिळविता आला आहे. त्या‍मुळे या सामन्याात सलग चार विजय मिळवलेल्या राजस्थान रॉयल संघाला विजयाची संधी आहे. त्यामुळे गुरुवारी होत असलेल्या या सामन्यात कोण विजय मिळविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून उंचावलेल्या सांघिक कामगिरीमुळे राजस्थानला सलग चार विजय मिळवता आले आहेत. फलंदाजी बहारदार होत नसली तरी अजिंक्य रहाणेने ब-यापैकी सातत्य राखले आहे. युवा करुण नायरच्या रूपाने आघाडीच्या फळीला स्थिरता आली असली तरी स्टीव्हन स्मिथ, संजू सॅमसन, जेम्स फॉकनरला अद्याप अपेक्षित फॉर्म सापडलेला नाही. कर्णधार शेन वॉटसनलाही कामगिरी उंचवावी लागेल.

हैदराबादकडे सांघिक कामगिरीचा अभाव आढळतो. डेव्हिड वॉर्नर आणि मध्यमगती भुवनेश्वर कुमार वगळता त्यांचे सर्व प्रमुख फलंदाज आणि गोलंदाज अपयशी ठरलेत. सांघिक कामगिरी उंचावण्यासाठी कर्णधार आणि सलामीवीर शिखर धवनला स्वत:पासून सुरुवात करावी लागेल.गोलंदाजीतही वेगवान डेल स्टेन, मध्यमगती करन शर्मा, डॅरेन सॅमी आणि लेगस्पिनर अमित मिश्राला स्वत:च्या चुका शोधून काढण्याची आवश्यकता आहे.

Leave a Comment