सेहवागमुळेच कामगिरी उंचावली- संदीप शर्मा

sehwag
दुबई- नु‍कत्याच झालेल्या आयपीएलच्या पंजाबविरूध्द कोलकत्ता नाईट रायडर्स या सामन्यात संदिप शर्माने चमकदार कामगिरी केली आहे. या सामन्यात त्यांने केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरारवच पंजाब संघाला ख-या अर्थानेविजय मिळविता आला. याबाबतीत विरेंद्र सेहवाग यांनी दिलेल्याप टिप्समुळे बरेच काही शिकायला मिळाले अशी प्रतिकिया संदीप शर्मा यांनी दिली आहे.

पंजाबचा तेज गोलंदाज संदीप शर्माने आयपीएल लढतीत बेंगळुरूवर मिळवलेल्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.या सामन्याळत दमदार गोलंदाजी करताना संदीप शर्माने अनुक्रमे क्रिस गेल, पार्थिव पटेल, विराट कोहली अशा एकापेक्षा एक सीनियर फलंदाजांना बाद केले. मुख्य म्हणजे या वीस वर्षांच्या गोलंदाजाने कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न केला आहे. बेंगळुरुआधी कोलकात्याविरुद्धच्या लढतीतदेखील संदीपने मनीष पांडे, गौतम गंभीर आणि मधल्या फळीतील सूर्यकुमार यादवचा अडसर दूर करताना पंजाबच्या विजयात मोलाची भूमिका उचलली.

संदीपची कामगिरी उंचावण्यासाठी ‌वीरेंदर सेहवागचे आसपास असणे फायदेशीर ठरले. पंजाब संघासाठी अद्याप वीरूने संघातील तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम सेहवाग चोख बजावतो आहे.’वीरू पा, हे विलक्षण व्यक्तीमत्त्व आहे. सामना किंवा सरावादरम्यान माझ्या गोलंदाजीतील त्रूटी दाखवून देत त्यावर तो तोडगा सूचवतो. कधी कधी नेटमधील स्वतःची फलंदाजी थांबवून सेहवाग माझ्या जवळ येतो अन् तोडगा सूचवतो. पंजाब संघातून त्याच्यासह खेळण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच’, अशी भावना हा उदयोन्मुख गोलंदाज व्यक्त करतो.

Leave a Comment