सहा महिन्याचा काळ वेदनादायी- ज्वाला गट्टा

jwala-gatta
नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा दिधा मनस्थितीत अडकली आहे. एकीकडे टीकाकारांनी ‘बंडखोर’ असा शिक्का मारला असून दुसरीकडे प्रशासकांच्या बंदीचे संकट समोर उभे आहे त्यायमुळे गेल्यास काही दिवसांपासून ती अडचणीत सापडली आहे. आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पध्रेत तिने कांस्यपदक जिंकले असले तरी गेल्याप सहा महिन्याचचा काळ माझ्यासाठी दु:खद आणि वेदनादायी असे मत ज्वाला गट्टा हिने व्यक्त केले आहे.

भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने ज्वालावर गेल्या वर्षी इंडियन बॅडिमटन लीग स्पध्रेतील क्रिश दिल्ली स्मॅशर्स आणि बांगा बिट्स यांच्यातील सामन्याला वादग्रस्त पद्धतीने दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून आजीवन बंदी घातली होती. परंतु भारतातील सर्वोत्तम दुहेरी बॅडमिंटनपटू ज्वाला त्याविरोधात कायदेशीर लढा देत आहे. गेल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत हैदराबादच्या ३० वर्षीय ज्वालाने देशाला अनेक पदके मिळवून दिली आहेत.

पदक जिकल्यांनतर बोलताना ज्वाला गट्टा म्हॅणाली ”हे पदक म्हणजे माझ्यासाठी एक प्रकारचा बदलाच आहे. मी माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्धचा लढा देण्यासाठीच खेळते आहे. सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनांच्या यातना मला अजूनही वेदना देत आहेत. त्यामुळेच पदकाचा आनंद मला शांततेनेच साजरा करता आला,”

Leave a Comment