राजस्थानचा कोलकत्यावर रॉयल विजय

ipl
अबुधाबीः आयपीएलमधील रोमहर्षक लढतीत टाय झालेला हा सामना राजस्थारन रॉयल्सवने सुपर ओव्हधरमध्येए जिंकून कोलकत्ताड नाईट रायडर्सचा पराभव केला. राजस्थान रॉयल्स कडून फलंदाजी करताना अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन यांनी दमदार फलंदाजी केली. दोघांच्या, दमदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या विजय मिळविता आला.

सातव्या आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर अंजिक्या रहाणे यांनी दमदार अर्धशतक केले. त्याला वॉटसन यांनी दमदार फलंदाजी करीत उपयुक्त साथ दिली. त्याचमुळे यावेळी राजस्थान रॉयल्सला कोलकात्याविरुद्ध दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या शेन वॉटसन आणि रहाणे यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी रचली. वॉटसनने २४ चेंडूंत ५ चौकारांसह ३३ धावा केल्या. रहाणेने एका बाजूने किल्ला लढवताना ५९ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ७२ धावांची खेळी केली. कोलकात्यासमोर विजयासाठी १५३ धावांचे आव्हान आहे.

विजयासाठी १५३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्यास कोलकत्त़नयाची सुरुवात निराशाजनक झाली. प्रत्युत्तरात कोलकात्याने कर्णधार गंभीरच्या ४५ धावांच्या खेळीच्या भरवशावर चांगली सुरुवात केली होती. कोलकात्याला शेवटच्या षटकात १२ धावांची गरज होती. मात्र, राजस्थानकडून फ्युकनरने केलेल्या घातक गोलंदाजीने हा सामना टाय झाला. त्यानंतर सुपरओव्हरमध्ये कोलकात्याने मनीष पांडेच्या षटकाराच्या भरवशावर १२ धावा काढल्या. या षटकात फ्युकनरने पुन्हा एकदा प्रभावी गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात तडाखेबाज फलंदाज डेव्हिड स्मिथ आणि शेन वॉटसनने केलेल्या फलंदाजीने राजस्थानने हा सामना जिंकला.

Leave a Comment