मुंबई इंडियन्सचा सलग पाचवा पराभव

mi
अबूधाबी- आयपीएल स्पलर्धेच्या सातव्या मौसमात गतविजेत्या मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या पाच सामन्यांपैकी ए‍कही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे हा संघ अडचणीत सापडला आहे. सनरायजर्स हैदराबादच्याक १७२ धावाच्याच आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून किरॉन पोलार्डने प्रयत्नांची शर्थ केली, पण मुंबईला १५७ धावाच करता आल्या आणि त्यांना १५ धावांची पराभव स्वीकारावा लागला. हा या स्पर्धेतील सलग पाचवा पराभव होता.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि याचा चांगलाच फायदा हैदराबादने उचलला. हैदराबादचे दोन्ही सलामीवीर ३८ धावांमध्ये बाद झाले. मग डेव्हिड वॉर्नर आणि लोकेश राहुल यांनी तिस-या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी रचत संघाचा धावसंख्येला चांगला आकार दिला. वॉर्नरने तडफदार फलंदाजी करत १ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ६५ धावांची खेळी साकारली, तर राहुलने ३ चौकारांच्या जोरावर ४६ धावांची खेळी साकारत वॉर्नरला चांगली साथ दिली.

हैदराबादच्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवातीला ३ बाद ३१ अशी दयनीय अवस्था होती. पण त्यानंतर अंबाती रायुडू (३५) आणि किरॉन पोलार्ड यांनी तिस-या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण रायुडू बाद झाल्यावर पोलार्डने अर्धशतक पूर्ण करत अमित मिश्राच्या १७व्या षटकात तीन षटकारांसह एक चौकार वसूल करत २७ धावा काढल्या. अखेरच्या षटकामध्ये २० धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर इरफान पठाणने पोलार्डला बाद करत सामना हैदराबादच्या बाजूने झुकवला. पोलार्डने ४८ चेंडूंत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर ७८ धावांची तुफानी खेळी साकारली.

Leave a Comment