मिलरच्या फलंदाजीमुळे बेंगळरू पराभूत

miller
बंगळूरु – आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्यांचा विजयचा सिलसिला कायम ठेवला आहे. त्यांरच्याा सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांंना प्रत्ये६क सामन्याात विजय मिळत आहे. पंजाबच्या मिलरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूध्दच्या सामन्यात दमदार फलंदाजी केली. मिलरने फक्त २९ चेंडूत ६६ धावा तडकावल्या. यात आठ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्या.मुळेच बेंगळरू संघाला ३२ धावाने पराभव पत्काररावा लागला.
या सामन्यात बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचया मिलरने फक्त २९ चेंडूत ६६ धावा तडकावल्या. ग्लेन मॅक्सवेलने ११ चेंडूत २५ धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. विरेंद्र सेहवागने (३०) आणि मनदीप सिंगने (२१) धावा केल्या. बंगळुरुकडून चाहल, पटेल आणि स्टार्कने प्रत्येकी दोन गडी बाद केले. पटेल महागडा गोलंदाज ठरला त्याच्या तीन षटकात पंजाबच्या फलंदाजांनी ५६ धावा वसूल केल्या. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुसमोर विजयासाठी १९९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

पंजाबच्या १९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरुने नऊ गडी बाद १६६ धावा केल्या.एबी डीविलियर्सचा अपवाद वगळता बंगळुरुचे अन्य आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. संदीप शर्माने प्रभावी मारा करत ख्रिस गेल, विराट कोहली आणि पार्थिव पटेलला तंबुची वाट दाखवली. गेल चार धावांवर बाद झाला. संदीपने कोहलीला भोपळाही फोडू दिला नाही. युवराज सिंगने फक्त तीन धावा केल्या. त्याला शिवम शर्माने बाद केले. बंगळुरुकडून डिविलियर्सने २६ चेंडूत ५३ धावा तडकवल्या. यात एक चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता.

Leave a Comment