बंगलोर समोर पराभव टाळण्याचे आव्हान

ipl
बंगलोर- आयपीएलच्या सातव्यापर्वात सुरूवातीच्या दोन सामन्याात विजय मिळवित बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने दमदार सुरुवात केली होती. मात्र, त्यांनतर सलग तीन सामन्यात बंगलोरच्यात संघाला पराभव स्वीेकारावा लागल्याने संघावर दडपण आले आहे. या दडपणाचा कशा पध्दतीने मुकाबला करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंगलोरची गाठ रविवारी सनरायझर्स हैदराबादशी पडत आहे. या सामन्यात कोण विजय मिळविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बंगलोरचा पहिलाच सामना घरच्या मैदानावर होत आहे. त्यामुळे आता त्यांना घरचे मैदान तरी ‘लकी’ ठरते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. बंगलोरकडे फलंदाजांची सर्वोत्कृष्ट फळी आहे मात्र ती आतापर्यंत कागदावरच राहिली. पहिल्या चार सामन्यांना मुकलेला ख्रिस गेलने गेल्या लढतीत पंजाबविरुद्ध पहिल्याच षटकात २० धावा तडकावल्या. मात्र त्यात तो सातत्य राखू शकला नाही. यास्थितीत गेलचे टिकून राहणे यजमानांसाठी आवश्यक आहे. त्याच्या जोडीला सलामीवीर पार्थिव पटेललाही एक बाजू सांभाळणे आवश्यक आहे. कर्णधार विराट कोहली, युवराज सिंग, एबी डेव्हिलियर्स या फलंदाजांनी आतापर्यंत सपशेल निराशा केली. मिचेल स्टार्क, अशोक डिंडा, वरुण आरोन हे वेगवान त्रिकुट ब-यापैकी कामगिरी करत आहेत. मात्र त्यांना धावफलकावर जास्त धावा नसल्याने फार काही करता येत नाही. यास्थितीत लेगस्पिनर युझवेंद्र चाहलने पाच सामन्यांत सात विकेट घेत प्रभाव पाडला.

तसे पाहिले तर दुसरीकडे हैदराबादची स्थितीही फार वेगळी नाही. त्यांचा संघ अॅारन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर या ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर मोठया प्रमाणात अवलंबून आहे. सलामीवीर आणि कर्णधार शिखर धवनने तर सपशेल निराशा केली आहे. मधल्या फळीत लोकेश राहुल ब-यापैकी खेळत आहे. मात्र वेस्ट इंडिजच्या डॅरेन सॅमीला आतापर्यंत ‘मॅचविनिंग’ कामगिरी करता आलेली नाही. त्यारमुळे या सामन्यामत कोण विजय मिळविणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment