बंगलोरची हैदराबादवर चार गडी राखून मात

banglore
बेंगलोर- आयपीएल स्पर्धेतील चितथरारक सामन्यात बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने सनरायझर्स हैदराबादवर चार गडी राखून विजय मिळवला. बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने डेविलीयर्सने ४१ चेंडूत ८९ धावा करुन तो नाबाद राहिला. तर गेलने २७ धावा केल्या. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर विजय मिळविता आला. सलग तीन सामन्यात झालेल्या पराभवानंतर बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने हा सामना जिंकला आहे.

बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हैदराबादचे सलामीवीर फिंच (१३) आणि शिखर धवन ३७ धावा करुन बाद झाला. तर राहुल अवघ्या सहा धावा करुन तंबूत परतला. सॅमीने आठ तर ओझाने १५ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने ४९ चेंडूत तीन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने ६१ धावा करुन संघाचा डाव सावरला. सनरायझर्स हैदराबादला डेव्हिड वॉर्नरच्या ६१ धावांच्या खेळीमुळे सहा बाद १५५ धावा करता आल्या.

सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी दिलेले १५६ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्यात बंगलोर रॉयल चॅलेंजर्सची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर गेलने २७ धावा केल्या. तर विजयाचा शिल्पकार असलेल्या डेविलीयर्सने ४१ चेंडूत ८९ धावा करुन तो नाबाद राहिला. डेविलीयर्सच्याा या खेळीमुळेच बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने सहा गड्यांच्या बदल्यात विजय मिळविता आला.

Leave a Comment