दिल्लीस-हैदराबाद आमने-सामने

ipl123154

नवी दिल्लीं- आयपीएलच्याा यावर्षीच्यान स्प र्धेत दिल्लीर डेअर डेव्हिल्सने सर्वांचीच निराशा केली आहे. हा संघ गुणतालिकेत सर्वात खाली आहे. आतापर्यंत झालेल्या् आठ सामन्याहत केवळ दोन सामने त्यांाना जिंकता आले आहेत. शनिवारी दिल्लीची गाठ पडत आहे ती सनरायजर्स हैदराबादशी होत आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी हा सामना करो किंवा मरो असे असून कसल्यााही परिस्थितीत आयपीएलमधील स्था्न टिकवण्यालसाठी हा सामना जिंकावा लागणार आहे.

फिरोझशाह कोटला स्टेडियमच्या घरच्या मैदानावर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची विजयासाठीची वणवण संपलेली नाही. या मैदानावर झालेल्या गेल्याड तिन्ही सामन्यांत त्यांना विजय मिळवता आलेला नाही. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून दिल्लीने सात विकेट्सने हार पत्करली. त्यानंतर अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून त्यांनी आठ विकेट्सने पराभव पत्करला.या पाश्र्वभूमीवर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे मनोधर्य खचले आहे.

दिल्लीच्या फलंदाजीत जसा सातत्याचा अभाव आढळतो, तसाच गोलंदाजांनाही आपला प्रभाव पाडता आलेला नाही. मोहम्मद शमी, वेन पार्नेल, सिद्धार्थ कौल यांच्या कामगिरीचा परिणाम संघावर होत आहे. याचप्रमाणे ट्वेन्टी-२०मधील दिग्गज खेळाडू आणि कर्णधार केव्हिन पीटरसनसुद्धा धावांसाठी झगडत आहे. पीटरसनला पाच डावांमध्ये फक्त ६२ धावा करता आल्या आहेत. त्याठमुळे आता दिल्लीटला हैदराबादच्याक विरोधातील सामन्या्त विजय मिळवावा लागणार आहे.

Leave a Comment