टीम इंडियाच्या आशा विराट, पुजारावर

kohli
मुंबई- आगामी काळात म्हणजेच आयपीएलचा सातवा सिझन संपल्यांलनतर टीम इंडिया इंगलंडच्याध दौ-यावर जाणार आहे. टीम इंडिया इंगलंडविरूदध ९ जुलै ते १९ ऑगस्ट या कालावधीत इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौ-यात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामन्याचा समावेश आहे. यामध्यें टीम इंडियाची मदार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दमदार फलंदाजांवर अवलंबून असणार असल्या चे मत इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने व्यक्त केले.

तीन वर्षापूवी म्हमणजेच २०११मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंड भूमीवर भारताने ०-४ अशा फरकाने सपाटून मार खाल्ला होता. इंग्लंडच्या त्या विजयात पीटरसन याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. लॉर्डसवरील पहिल्या कसोटी सामन्यातील द्विशतकाचा त्यात समावेश होता. त्यालमुळे आगामी काळात टीम इंडियाची कामगिरी कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

यावेळी बोलताना पीटरसन म्हणाला, आगामी भारत-इंग्लंड मालिका रंगतदार होईल. इंग्लंडच्या संघाची जडणघडत होत आहे, तर भारतीय संघाच्या फलंदाजीच्या फळीत चांगली गुणवत्ता आहे. टीम इंडियाकडे पुजारा, कोहली आणि मुरली विजयसारखे फलंदाज आहेत. इंग्लंडमध्ये धावा काढण्याचे तंत्र त्यांच्या फलंदाजीत आहे. त्यांनी अपेक्षेनुरूप धावा काढणे महत्त्वाचे आहे, अन्यथा भारताला मोठी धावसंख्या उभारणे कठीण जाईल. भारताच्या मागील इंग्लंड दौ-यावर फक्त राहुल द्रविडलाच धावा काढणे जमले होते. परंतु सध्याची भारताची फळी चांगली आहे.

Leave a Comment