गेलचा आणखी एक अनोखा विक्रम

gayle_5
दुबई: टी २० क्रिकेटमध्ये दमदार खेळीच्या जोरावर प्रेक्षकांच्या डोळयाचे आपल्या फलंदाजीने पारणे फेडणा-या ख्रिस गेलने आणखी एक अनोखा असा विक्रमाला गवसणी घातली आहे. वेस्ट इंडिजचा सलामीचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण केल्याड आहेत. टी २० च्या प्रकारात ६००० धावा पूर्ण करणार गेल हा जगातील पहिला खेळाडू बनला आहे.

आयपीएलच्या सातव्या स्प्र्धेतील काही सामन्यात त्याला दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. त्यामुळे त्याच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली आहे. मात्र जखमी असल्याने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरच्या सुरुवातीच्या‍ सामन्यात तो खेळला नव्हता. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा ६००० धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त ८ धावांची गरज होती. ग्लेन मॅक्सवेलच्या पहिल्या तीन बॉलवरच त्याने ६००० धावा पूर्ण केलं.

मॅक्सवेलच्या या ओव्हरमध्ये त्याने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले. मात्र संदीप शर्माच्या पुढच्याच ओव्हरमध्ये गेल बोल्ड झाला. त्यामुळे त्याच्या नावावर आता १६५ सामन्यांमध्ये ६०१२ धावा जमा झाल्या आहेत. ज्यामध्ये ११ शतके आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० क्रिकेटमध्ये गेलनंतर ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅड हॉजने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सतर्फे खेळणा-या हॉजने आतापर्यंत २१८ सामन्यात ५ हजार ९८५ धावा ठोकल्या आहेत.

Leave a Comment