काँग्रेसचे अपयश भाजपची हजारी भाग यंत्रणाच अस्तित्वात नसल्याचे उघड

puneelection_1
पुण्यात मतदानाच्या दिवशी मतदार यादीतून नावे गायब झाल्याचा मोठा गदारोळ झाला. लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. नावे वगळली गेलेल्या मतदारांना तक्रारी देण्यास सांगितले तर फक्त 1340 तक्रारी आल्या यात मोठे अपयश भाजपचे आणि काही प्रमाणात काँग्रेसचे आहे. भाजपची पूर्वी असलेली हजारी भाग यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे यावरून सिद्ध होते. दरवेळी निवडणूकीचा प्रचार सुरू झाला की भाजपची हजारी भाग यंत्रणा कामाला लागते. प्रत्येक हजारी भागातील कार्यकर्ते आपापल्या मतदान केंद्राची यादी घेऊन घरोघर जाऊन ती तपासतात. कोण गावाला गेले, कोण मयत झाले, कुणी पत्ता बदलून दुसरीकडे रहायला गेले अशा सर्व कारणांसाठी न येऊ शकणा-या मतदारांची महिती त्यांच्याकडे अगोदरच गोळा होत असे. त्यामुळे आपल्या केंद्रावर नेमके किती मतदान होईल आणि मतदार कोण आले यावरून तेथे किती मत मिळतील याचा अंदाज कार्यकर्ते बांधत असत. या यंत्रणेला त्यांच्या पक्षात हजारी भाग यंत्रणा असे संबोधण्यात येत होते.

गेल्या काही निवडणुकांपासून भाजपची ही यंत्रणाच काम करताना दिसत नाही. यावेळीही अशा प्रकारची यंत्रणा नव्हती जर त्यांची हजारी भाग यंत्रणा कार्यरत असती तर हा गोंधळ मतदानच्या दिवशी नाही तर अगोदरच झाला असता. त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हणा किवा त्यांच्या यंत्रणेने अशाप्रकारची याद्यांची घरोघर जाऊन तपासणी केलेलीच नसल्याने भाजपकेडीही वगळेल्या नावाचीं यादी नाही. त्यामुळे किती जणांची नावे वगळली यावर किमान लाखभर असे मोघम उत्तर देण्याची वेळ त्यांच्या उमेदवार व शहराध्यक्ष शिरोळेंवर आलीच नसती.काँग्रेसचीही अशी बूथ यंत्रणा तयार केली जाते. एका मतदार केंद्राला त्यांनी एक बूथ असे संबोधले आहे. पण अशी यंत्रणा फार कुठे याद्या तपासणे किंवा अशी कामे करताना दिसत नाही. मात्र पक्षाच्या मतदारांच्या परिसरात अशी यंत्रणा कार्यरत असते. त्यामुळे यावेळी नावे वगळण्याच्या गोंधळात ते फार काही करू शकले नसते.त्यांमुळे त्यांच दोष आहे पण कमी प्रमाणात.

नावे वगळण्याच्या प्रकाराच्या विरोधात जनहित याचिका दाखल झाली. त्यात राज्य सरकारने नावे वगळण्याच्या फक्त 1340 तक्रारी आल्याचे उच्चन्यायालयात सांगितले आहे. या प्रकरणात पहिल्यापासून आंदोलन करणा-या भाजपच्या कार्यकर्त्यांनी किती तक्रारी नोंदवल्या ? जर त्यांनी तक्रारी नोंदवल्या असत्या तर हा आकडा नक्कीच वाढला असता. पण आता भाजपचेही कार्यकर्ते हे नेते समजत असल्याने हजारी भागात काम करण्यात कमीपणा मानतात त्याचेच हे फळ आहे. यात बेमुदत उपोषणाचा स्टंट करणारे शिरोळे आता काय करणार ? चौकट
1832 मतदान केंद्र : हजारी भाग यंत्रणापुणे शहर लोकसभा मतदारसंघात एकूण 1832 मतदान केंद्रे आहेत भाजपच्या पक्षीय भाषेत तेवढे हजारी भाग आहेत. या प्रत्येक सोडाच पण शेदोनशे हजारी भागांच्या (मतदान केंद्रांच्या) याद्या घरोघर जाऊन प्रत्यक्ष तपासणीचेकाम जरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेअसतेतरी त्यांच्याकडेत्यातील मागेदोनवेळा मतदान केल्यावर यावेळी वगळलेल्या नावांची महिती आणि तक्रारी मतदानापूर्वीच गोळा झाल्या असत्या.

मतदार यादीतील नाव किंवा पत्ता किंवा फोटो बदलला अशा चूकाही समजल्या असत्या. यावेळी नावे वगळली असल्याच्या तक्रारी त्यांना अगोरदच निवडणूक निर्णय अधिका-यांकडे करता आल्या असत्या. या तक्रारींमुळे त्यांनी जो 1 लाख 8 हजार दुहेरी नावांचा आरोप केला होता त्याला बळ मिळाले असते.

Leave a Comment