दुबई – वनडे रॅकिंगमधील क्रमवारी नुकतीच जाहीर झाली आहे. या जागतीक क्रमवारीत टीम इंडियाचा दमदार फलंदाज विराट कोहली यांने दमदार खेळीच्याह जोरावार अव्व्लस्थानी झेप घेतली आहे. अशास्वरुपाची कामगिरी करताना त्यांने दक्षीण अपिफेकेचा भरवशाचा फलंदाज ए.बी. डिव्हिलियर्सला कोहलीने मागे टाकले आहे.
वनडे रॅकिंगमध्ये विराट अव्वल
नुकत्याच जाहीर झालेल्या वनडेच्या मानांकनाच्या यादीत अव्वल स्थान मिळवण्यात टीम इंडियाच्या विराट कोहलीला पुन्हा यश आले. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील त्याची कामगिरी पाहता विराटच्या गुणसंख्येत वाढ झाली आहे. एबी डिव्हिलियर्सपेक्षा दोन गुणांनी मागे असताना विराट न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत उतरला होता. १२ महिन्यांत कोहलीने १५८० धावा लगावत एबीला मागे टाकण्याचा पराक्रम केला. यादरम्यान त्याने सहा शतके ठोकली आहेत. त्यातील तीन मायदेशी काढलेली आहेत. याच कालावधीत तीन शतकाच्याध एबीने ११५६ धावा लगावल्या.
अव्वल दहामध्ये आणखी काही टीम इंडियाच्याी समावेश आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी सहाव्या तर शिखर धवन आठव्या स्थानी पोहोचला. लहिरू थिरमन्ने याने तब्बल २९ स्थानांची झेप घेत ३९व्या स्थानी आपली जागा निश्चि.त केली. मलिंगा हा सगळ्यात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघाच्या यादीत अव्वल स्थानी कायम आहे.