मुंबईच्या प्रशिक्षकपदी प्रवीण आमरे

aamre
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या सीनियर क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा तिढा आता सुटला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षका विना असलेल्या मुंबईच्या सीनियर क्रिकेट संघाला प्रवीण आमरेच्या रूपाने आता नवीन प्रशिक्षक मिळाला आहे. यापूवी प्रवीण अमरे यांच्या प्रशिक्षणाखाली मुंबई क्रिकेट संघाने रणजी स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवली होती. त्यामुळे आता यावेळेस सुध्दा त्यांना जिंकण्याीची संधी असणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) सोमवारी प्रशिक्षक निवडीसंदर्भातील बैठक पार पडली. या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत प्रवीण अमरे यांच्या खांद्यावर मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली. गेल्या वर्षातील अपयश पुसून टाकण्याची जबाबदारी अमरे यांच्यावर असणार आहे. ते ही जबाबदारी कशी पेलताहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गेल्या मोसमात जवळपास सर्वच वयोगटांमध्ये मुंबई संघाने पराभव स्किारला आहे. त्यावमुळेच एमसीएकडून सुलक्षण कुलकर्णी यांना सीनियर संघाच्या प्रशिक्षकपदावरून काढून टाकण्यात आले होते. त्यांकच्याु जागी कोणाची निवड करायची असा पेच पडला होता. त्यानंतर मुंबई संघाला कायमस्वरूपी प्रशिक्षकाची गरज होती. एमसीएकडून अखेर सोमवारी प्रशिक्षकपदासाठी अमरे यांच्या नावावर तूर्त तरी एका वर्षासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे आता आमरेची कामगिरी कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment