डेल स्टेन, इशांतची कॉपी करणार नाही-भुवनेश्वरकुमार

kumar
नवी दिल्लीः यापुढील काळात गोलंदाजी करीत असताना मी कोणाचीच कॉपी करणार नाही. मला गोलंदाजी करीत असताना वेग वाढवायचा नाही. मला गोलंदाजीचा वेग वाढविणे हे पटत नाही. मला चेंडूला स्वींचग करायला आवडते. तेच माझे प्रमुख अस्र्चा आहे. त्याच्या जोरावर मी आतापर्यंत खूप बळी मिळवले आहेत. त्या‍मुळे गुणांच्या आधारे चमक दाखवणेच मला आवडले असे मत टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज असलेल्या‍ भुवनेश्वरकुमारने व्यक्त केले.

याबाबत बोलताना भुवनेश्वरकुमार म्हणाला, दुस-या गोलंदाजांची नक्कल करण्यापेक्षा आपल्या अंगभूत गुणांच्या आधारे चमक दाखवणे मला आवडते. स्टेन व इशांत शर्माप्रमाणे स्वतःच्या गोलंदाजीचा वेग वाढवण्याचा मोह त्याला कधीच झाला नाही. तो म्हणतो, ‘इतरांची नक्कल मी कधीच करणार नाही. तसेच माझ्या सहकारी गोलंदाजांच्या वेगाशीही मला स्पर्धा करायची नाही. योग्य टप्प्यात मारा करत चेंडू स्विंग केल्यास यश मिळेल.

भुवनेश्वरचा भर हा हैदराबाद संघातून खेळत असताना स्टेनसारख्या गोलंदाजाकडून अधिकाधिक शिकून घेण्यावर असतो. ‘स्टेन म्हणजे गोलंदाजीची शाळाच आहे. त्याच्याकडून खूप काही शिकता येते. त्याला गोलंदाजी करताना बघूनच गोलंदाजीतील अनेक बारकावे शिकता येतात. स्टेनची शिस्त करडी असते, तो हकनाक वेळ घालवत नाही. यामधून मी अनेक गोष्टी शिकलो आहे’, असेही यावेळी बोलताना भुवनेश्वरकुमार म्हणाला.

Leave a Comment