आयपीएलचा अंतिम सामना वानखेडेवरच

wankhede
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून आयपीएल स्पधेचा अंतिम सामना कुठे होणार यावरून चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा सामना कुठे होणार याबाबत सर्वांच्या मनातच संभ्रम होता. हा संभ्रम दुर करण्याचा प्रयत्न मुंबई क्रिकेट असोसिएशनने केला असून ३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर होणारा क्वालिफायर २ चा सामना तसेच १ जूनचा अंतिम सामना दुस-या मैदानावर न होता हा सामना वानखेडेवरच होईल, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी स्पाष्टह केले आहे. त्यामुळे संभ्रम काहीसा दूर झाला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सावंत म्हणाले, ‘मुंबई इंडियन्सचे सामने वानखेडेवरच होतील असा करार आहे. शिवाय, गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावरच अंतिम सामना खेळविण्याविषयीही नियम आहे. त्यामुळे यंदाचा अंतिम सामना हा मुंबईत वानखेडेवरच होईल.’ आयपीएलच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेले सुनील गावस्कर, आयपीएलचे गव्हर्निंग कौन्सिलचे प्रमुख रणजीब बिस्वल यांनी ३० मे व आयपीएल फायनलच्या लढती वानखेडेकडून काढून घेण्यात आलेल्या नाहीत असे स्पष्ट केले आहे.

काही दिवसापूर्वीच भारतीय क्रिकेट बोर्डाकडून वानखेडेवरील सामन्याच्या आयोजनाबाबत नाराजी असल्यामुळे हे सामने वानखेडेवरून काढून अनुक्रमे सीसीआय व बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्याचा विचार असल्याचे वृत्त होते. पण एमसीएने याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. याआधी २८ तारखेला होणारा एलिमिनेटरचा सामना चेन्नईऐवजी सीसीआयवर होईल, असे बीसीसीआयकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे या सामन्याबाबत अजूनही संभ्रम आहे.

Leave a Comment