भारतीय निवडणुकीचा चेहरा बदलला सोशल मीडियाने

socialmedia
वॉशिंग्टन – सोशल मीडियाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा चेहरा बदलून टाकला. अमेरिकेच्या फेसबुक, टिव्टर आणि गुगल या साइटस्चा राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मोठय़ा प्रमाणात वापर केला. ब्रेकिंग न्यूज, एकमेकांच्या विरोधात बातम्या पसरवण्यासाठी या माध्यमांचा वापर केला. पारंपरिक मीडियापेक्षा या सोशल मीडियाचा आधार घेण्यात आला.

या सोशल मीडियाचा परिणाम किती प्रमाणात झाला हे आता १६ मेनंतरच कळणार आहे. या विषयावर शैक्षणिक संशोधन होऊ शकते. या आधुनिक मीडियाच्या वापरामुळे तीन अमेरिकन कंपन्यांचा भारतातील वापर वाढला आहे. भारतात फेसबुकचे १० कोटी वापरकर्ते असून टिव्टरच्या खात्यांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. देशात सातव्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर जवळजवळ ४ कोटी ९० लाख टिव्टरची खाती उघडली गेली. २०१३ मध्ये टिव्टरची देशात २ कोटी खाती होती.
२००९ मध्ये शशी थरूर हे एकमेव राजकारणी होते. ज्यांचे स्वत:चे टिव्टरचे अकाउंट होते. त्यांचे २६ लाख फाओअर्स आहेत. गेल्या पाच वर्षात सर्व पक्षांच्या नेत्यांचे अकाउंट आहे. तर नरेंद्र मोदी यांचे ३ कोटी ८९ लाख फाओअर्स आहेत.फेसबुकवर मोदींचे १४ दशलक्ष फॅन्स असून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर त्यांचा क्रमांक लागतो.

राजकीय पक्ष, नेते आणि उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. त्यामुळे फेसबुक, टिव्टर आणि गुगलला चांगला महसूल मिळाला. या कंपन्यांनी नेमके किती रुपयांचा महसूल मिळवला याची माहिती दिलेली नाही. गेल्या वर्षीपासून फेसबुकने भारतीय निवडणुकीवर काम करायला सुरुवात केली होती, असे फेसबुकचे धोरणात्मक व्यवस्थापक केटी हारबाथ यांनी सांगितले. कंपनीने इलेक्शन ट्रॅकर ही सुविधा सुरू केली. त्यामुळे ग्राहकांना रिअर टाइम माहिती मिळू लागली. उमेदवार आता फेसबुक व टिव्टरवरून ब्रेकिंग न्यूज पाहू शकतात.

बहुतांशी शहरी भागातील नागरिक सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. निवडणुकीमुळे ग्रामीण भागापर्यंत सोशल मीडिया पोहोचू लागला. आतापर्यंत सोशल मीडियाचा वापर हा राष्ट्रीय पक्षच वापर होते. मात्र, प्रादेशिक पक्षही सोशल मीडियाचा वापर करू लागले.
टिव्टर इंडियाचे भारतातील प्रमुख राहुल खुर्शीद म्हणाले की, सोशल मीडियामुळे भारतातील राजकारणात बदल झाले आहेत. टिव्टर आता भारतीय निवडणुकीचा अविभाज्य घटक बनला आहे.

नऊ टप्प्यात चालणारी निवडणूक हे मोठे आव्हान आहे. उमेदवार, पत्रकार आणि नागरिक हे निवडणुकीसाठी टिव्टरचा वापर करीत आहेत. त्यांनी निवडणुकीबाबतची सर्व माहिती रिअल टाइममध्ये मिळत असून ते त्यांची मते व्यक्त करीत आहेत, अशी माहिती टिव्टरच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गुगलने ‘गुगल इलेक्शन हब’ तयार केले आहेत. याचा फायदा ८० कोटी मतदारांना होत आहे. यात बातम्या, व्हीडिओ, सर्च ट्रेंड्स, जी +, मतांसाठी मोहीम आदी बाबी आहेत. गुगलने सात वर्षापूर्वीच पहिल्यांदा निवडणुकीबाबत खास उपक्रम हाती घेतला होता. विशेषत: अमेरिकेत भारतीय निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता आहे. उमेदवारांबाबत मतदारांनी अधिक जाणून घ्यावे अशी गुगलची भावना आहे

Leave a Comment