पुरूषांना कितीही विवाह करण्याची केनियात परवानगी

kenya
नैरोबी – पुरूषांना कितीही विवाह करता येतील असा वादग्रस्त निर्णय केनिया सरकारने घेतला असून राष्ट्रपती उहस केन्याता यांनी त्यावर सही केल्याने आता त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. सरकारच्या या निर्णयाची महिला अधिकार संघटनांनी निर्भत्सना केली आहे.

विवाहासंबंधीच्या सर्व नियमाच्या सखोल अभ्यास केल्यानंतरच हा नवीन कायदा तयार केल्याचा सरकारचा दावा आहे. विवाह हा पुरूष व महिलेच्या संमतीनेच होत असतो मग तो एक विवाह असूदे अथवा कितीही असू देत असे सरकारचे स्पष्टीकरण आहे. संसदेने गेल्या महिन्यात या निर्णयाविरूद्ध महिलांना खासदारांना विटोचा अधिकार दिला होता मात्र नंतर तो पुरूष खासदारांच्या विरोधामुळे काढून घेतला गेला. त्यामुळे जोरदार वादविवाद होऊनही महिला खासदारांचे कांही चालले नाही असे समजते.

केनियातील ४० चर्च व यहुदी संस्थांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. तर महिला वकील संघटना फिडा केनियाने या कायद्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले असल्याचे समजते.