निवडणूक आयोगाचे पाकिस्तानात कौतुक

election
इस्लामाबाद – देशाचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानमध्ये भारताविषयी ओढ असल्याचे लोकसभा निवडणुकीमुळे स्पष्ट झाले आहे,मात्र भारतात कसे वातावरण आहे,नियम कसे आहेत,याबद्दल तेथील राजकीय पक्षांना अप्रुप वाटत आहे. विशेषत; आपल्या देशातील निवडणूक आयोगाचे पाकिस्तानमध्ये गोडवे गायले जात आहेत.

पाकिस्तानकडून भारतातील एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल कौतुक करणे ही तशी दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट ;पण देशात सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात पाकिस्तानमधील एका राजकीय पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाचे कौतुक केले आहे.भारतातील निवडणूक आयोग हा राजकारण आणि लष्करापासून स्वतंत्र आहे. असे त्या पक्षाने म्हटले आहे तसेच पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाचीही अशीच रचना हवी असे, मत जमाते-ए-इस्लामी या पक्षाचे प्रमुख सिराज उल हक यांनी व्यक्त केले आहे.मध्यंतरी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते इम्रान खान यांनी गेल्यावर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अफरातफर झाल्याचे आरोप केला होता.

Leave a Comment