दुसर्‍या देशाचे नागरिकत्व- भारतीय, चिनी आघाडीवर

citizenship
दुसर्‍या देशाचे नागरिकत्व घेणार्‍यांची संख्या जगभरातच आतिशय वेगाने वाढत चालली असताना आशियाई देशात चीन आणि भारतातील धनवान यात आघाडीवर असल्याचे वेल्थ एक्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही देशातील अतिश्रींमत व्यक्ती परदेशात जाऊन राहण्यास अति उत्सुक असून सध्या २६९२५ नागरिक परदेशातच स्थायिक झाले असल्याचे हा अहवाल सांगतो.

या अहवालानुसार भारत आणि चीन या देशातून दुसर्‍या देशाचे नागरिकत्व घेणार्‍याची संख्या प्रचंड वेगाने वाढत चालली असून त्यात दिवसेनदिवस अशीच वाढ होत राहील असे संकेत मिळत आहेत. कांही नामवंत भारतीय अब्जाधीशांचाही त्यात समावेश आहे. लक्ष्मी मित्तल यांच्याकडे भारताबरोबरच ब्रिटनचे नागरिकत्व आहे तसेच पलोनजी मिस्त्री यांच्याकडे भारताबरोबरच आयर्लंडचे नागरिकत्व आहे.