व्हॉटस अॅप जगभरात लोकप्रियतेचे विविध उच्चांक स्थापन करत असतानाच इराण मध्ये मात्र या मेसेज सर्व्हीसवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामागचे कारण मात्र फारच विचित्र आहे. या कंपनीची मालकी फेसबुककडे आहे आणि फेसबुकचा संस्थापक व मालक मार्क झुकेरबर्ग हा धर्माने ज्यू असल्याने व्हॉटसअॅपवर बंदी घालण्यात आली असल्याचे समजते.
भारतीय निवडणुकीचा चेहरा बदलला सोशल मीडियाने
फेब्रुवारीत मार्कने व्हॉटसअॅप या मोफत मेसेज सर्व्हीस देणार्या कंपनीची तब्बल १९ अब्ज डॉलर्सला खरेदी केली आहे. इराण सायबर क्राईम समितीचे सचिव अब्दुल खारामाबडी म्हणाले की ज्यू वंशीय आमचे दुष्मन आहेत. त्यामुळे इराणमध्ये २००९ पासून फेसबुक आणि ट्वीटर सोशल साईटवर बंदीच आहे. व्हॉटसअॅपची मालकी फेसबुककडे गेल्याने त्यावरही बंदी घातली गेली आहे.