जहाज दुर्घटना- पंतप्रधान चुंग होंग वान यांचा राजीनामा

skorea
दक्षिण कोरियातील इंचियोन बंदराजवळ १६ एप्रिलला जहाज बुडून झालेल्या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान चुंग होंन वान यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्राध्यक्षांकडे दिला असून राष्ट्राध्यक्षांनी तो स्वीकारला आहे. या दुर्घटनेत ३०० हून अधिक प्रवासी मृत अथवा बेपत्ता झाले असून त्यातील १८७ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यात बहुतांश शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे.

आपल्या राजीनामा पत्रात वान म्हणतात की सरकारतर्फे ही दुर्घटना रोखण्यात अपयश आले आहे त्याबद्दल मी जनतेची माफी मागतो. गेला कांही काळ देशात गैरव्यवहार आणि चुकीची कामे हा समाजाचा हिस्साच बनला आहे अर्थात त्याविरूद्धची लढाईही देशात सुरू आहे. आशा आहे की भविष्यात यात सुधारणा होईल. पुन्हा अशी दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेतली जाईल. मात्र झाल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून मी राजीनामा देत आहे.

Leave a Comment