स्वतःच स्वच्छ होणारी कार

nissan
कुठेही प्रवास करून आले किंवा अगदी कुठेही गेले नाही तरी कारवर बसणारी धूळ हा सर्वच कारमालकांच्या दृष्टीने कटकटीचा मामला असतो. प्रवासादरम्यान तर धुळीबरोबर अनेकवेळा राडारोडाही कारवर बसतो. कार धुवून स्वच्छ करण्याशिवाय अशा वेळी अन्य पर्यायही नसतो. मात्र जपानच्या निस्सान कंपनीने स्वतःच स्वच्छ होणारी जगातील पहिलीवहिली कार बाजारात आणली आहे.

दीर्घकाळच्या रस्ते प्रवासानंतरही ही कार स्वच्छच राहणार आहे. त्यासाठी नॅनोपेंट टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे धूळ व घाण बसण्यापूर्वीच ती स्वच्छ होणार आहे कारण या पेंटवर धूळ व घाण चिकटूच शकणार नाही.त्यामुळे कार धुण्याची गरजच उरणार नाही. सुपर हायड्रोफोबिक – ओलियो फोबिक पेंटचा वापर यासाठी करण्यात आला असून हे पेंट पृष्ठभागावर पाणी तेल असे पदार्थही जमू देत नाहीत.

Leave a Comment