सैफ उल मलूक- पाकिस्तानमधील सुंदर सरोवर

पाकिस्तान म्हटले की शत्रू राष्ट्र असा भारतीयांचा समज होतो तसेच जगभरातील देशात पाकिस्तानची ओळख दहशतवादाला खतपाणी घालणारा देश अशी झाली आहे. मात्र हा देश अनेक नितांत सुंदर पर्यटनस्थळांनी परिपूर्ण असल्याची माहिती खूपच थेाड्या लोकांना आहे. भारत पाक सीमेवरील तणाव हा नेहमीच धगधगता मुद्दा असला तरी आजही अनेक पाकिस्तानी भारतात पर्यटनासाठी येतात तसेच अनेक भारतीयही पाकमध्ये पर्यटनासाठी जात असतात.

पाकिस्तानच्या खैबर जिल्ह्यातील सैफ उल मलूक सरोवर हे असेच भारतीय पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. पशिर्यन युवराज सैफ उल मलूक यांच्या आठवणीत रमलेले हे स्थळ येथील अतिरम्य सरोवरासाठी आणि नितांतसुंदर निसर्गासाठी प्रसिद्ध आहे. या सरोवरात मिळणारे ब्राऊन ट्राऊट मासेही अतिशय प्रसिद्ध आहेत. सात किलो वजनाचे हे मासे पर्यटकांसाठी खास आकर्षण आहेत. आपल्या नंदनवनाची म्हणजे काश्मीरची आठवण करून देतील असे निळे बर्फाचे डोंगर, दूरवर पसरलेली हिरवाई, नितळ पाणी आणि स्वच्छ ताजी हवा तसेच मनाला निवविणारी शांतता ही येथली खास वैशिष्ठये.

या ठिकाणी जाण्यासाठी बाकी सोपस्कार करण्यापूर्वी हे लक्षात ठेवावे की मे जून हा येथे जाण्यासाठीचा सर्वात चांगला काळ आहे. थंडीत हे सरोवर बर्फाने गोठलेले असते त्यामुळे चहूबाजूला बर्फाशिवाय कांही दिसत नाही हे लक्षात ठेवून आपले प्रवासाचे शेड्यूल ठरवावे.

Leave a Comment