वर्षअखेर इंटरनेट युजर जाणार ३ अब्जांवर

mobileusers
संयुक्त राष्ट्रसंघाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार या वर्षअखेर म्हणजे २०१४ च्या अखेरीर्पत जगभरात इंटरनेट युजरची संख्या ३ अब्जांवर तर मोबाईल धारकांची संख्या ७ अब्जांवर जाण्याची शक्यता आहे. यात दोन तृतीयांश वाटा हा विकसनशील देशांचा असेल असेही यात नमूद करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने ही आकडेवारी दिली असून त्यानुसार २०१४ अखेरपर्यंत जगातील ४४ टक्के घरांतून इंटरनेटचे कनेक्शन असेल. त्यात विकासशील देशांचा वाटा ३१ टक्के तर विकसित देशांचा वाटा ७८ टक्के असेल. विकासशील देशांत इंटरनेट कौटुंबिक स्तरावर वापरण्याचा विकास प्रचंड गतीने होत आहे. याच काळात मोबाईल धारकांची संख्या ७ अब्जांवर गेलेली असेल व त्यात आशिया पॅसिफिक भागाचा वाटा मोठा असेल. या भागात ही संख्या ३.६ अब्जांवर जाईल. दूरसंचार संघाचे महासचिव हॅमाईन टूर यांच्यामते समाजासाठी माहिती प्रसारण हे मुख्य प्रेरणा देणारे बनत चालल्याचे हे लक्षण आहे.

Leave a Comment