जगातले महागडे हॉटेल- जेवणासाठी मोजा सव्वा लाख रूपये

जगभरातील विविध रेस्टॉरंट अनेक कारणांनी चर्चेत असतात. कुठे सजावट उत्तम असते, कुठे रेस्टॉरंटची लोकेशन अप्रतिम असते, कुठे उत्तम चवीचे खाद्यपदार्थ मिळतात तर कुठे ठराविक पदार्थांसाठी खाद्यप्रेमीच्या रांगा लागत असतात. युरोपमधील इबिजा बेटावर असलेले पलाया डिअॅन बोसा रिसॉर्टमधील न्यू हार्ड रॉक रेस्टॉरंट जगातले सर्वात महागडे हॉटेल म्हणून प्रसिद्धिस आले आहे.

येथील जेवणात वीस कोर्सचा मेनू दिला जात असून त्यासाठी तब्बल १ लाख २२ हजार रूपये आकारले जातात. हे हॉटेल पंचतारांकित आहे आणि त्याचे औपचारिक उद्घाटन फेब्रुवारीत होणार असले तरी आत्तापासूनच येथे खवय्ये गर्दी करत आहेत असे मुख्य शेफ पाको रॉनसेरा यांचे म्हणणे आहे. तो म्हणतो येथील डिशेश स्पेशल तर आहेतच पण अप्रतिम चवीबरोबर त्या खाणार्‍याला वेगळे फिलिंग देतील असा आमचा दावा आहे. येथे एकदा जेवणारा माणूस हे हॉटेल कधीच विसरणार नाही. अर्थात इथला मेन्यू मात्र गुप्त ठेवला गेला आहे.

हार्ड रॉक शृंखलेतील हॉटेल अन्य देशातही आहेत. मात्र युरोपमधील हे हॉटेल या सर्वांहून वेगळे असल्याचा दावाही केला जात आहे.

Leave a Comment