चर्चमध्ये जाण्याने रक्तदाब आटोक्यात

meditation
रक्तदाब हा विकार प्रामुख्याने मनाच्या स्थितीवर अवलंबून असल्याने शांत मनाच्या व्यक्तीला तो होण्याची शक्यता कमी असते असे भारतीय आध्यात्मिक शास्त्र सांगते. सांगते म्हणजे अमुक एक साधना रक्तदाबावरचा इलाज आहे असे नेमकेपणाने सांगत नाही पण साधारणत: ज्याला जगण्याचा हेतू कळलेला असतो अशा माणसाला असले मनोकायिक विकार होण्याची शक्यता कमी असतेे. अशा विकारापासून बचाव करण्यासाठी आनंदी रहायला आले पाहिजे. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था येते तेव्हा हे विकार संभवत नाहीत. अर्थात आपण भारतीय लोक तसे म्हणतो. परदेशातले लोक तसे मानत नाहीत आणि या गोष्टीवर विश्‍वासही ठेवत नाहीत. आपण म्हणू की जो ध्यान धारणा करतो आणि खर्‍या अर्थाने धार्मिक असतो तो अशा विकारांपासून दूर राहातो पण, अमेरिकेतले काही लोक म्हणतात की दर आठवड्याला चर्च मध्ये जाणारे लोक रक्तदाबा पासून दूर राहतात.

बर्‍याच दिवसांपासून काही लोकांनी तसा अनुभवही घेतला होता पण आधुनिक विज्ञानाच्या पुरस्कर्त्यांना काही ही गोष्ट मान्य नव्हती. हे लोक आठवड्याला एकदा चर्चमध्ये जाऊन प्रार्थनाही करीत असतील आणि त्यांचा रक्तदाब आटोक्यात असेलही पण या दोन गोष्टींचा परस्परांशी काही संबंध नाही. बोलाङ्गुलाला गाठ पडावी तसा हा योगायोग आहे, असे शास्त्रज्ञ म्हणत असत. पण आता नॉर्वेत असे प्रयोगच करण्यात आले. दर आठवड्याला चर्चमध्ये जाणार्‍या एक लाख २० हजार लोकांंच्या रक्तदाबाच्या नोंदी घेतल्या असता चर्चमध्ये जाण्याचा आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्याचा योगायोगाने नाही तर थेट संबंध असल्याचे दिसून आले.

प्रयोगांती हा संबंध स्पष्टही झाला. हे लोक चर्चमध्ये जातात त्या दिवशी त्यांचा रक्तदाब नियंत्रणात असतो असे दिसून आले. अमेरिकेत ४० टक्के लोक चर्चमध्ये जातात. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येतल्या प्रयोगात नेमकेपणा येत नाही. नॉर्वेची लोकसंख्याही कमी आहे आणि तिथले केवळ ४ टक्के लोकच चर्चमध्ये जातात. तेव्हा त्यांच्या रक्तदाबाच्या नोंदी ठेवणेही सोपे जाते आणि हा नेमका चर्चमध्येच जाणारा वर्ग असल्याने त्यांच्या रक्तदाबाचा चर्चमध्ये जाण्याशी थेट संबंध आहे असे ठामपणे म्हणता येेते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment