केदारनाथ यात्रा ४ मे पासून

kedarnathडेहराडून- गतवर्षी हिमालयातील चार धाम यात्रेमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो भाविकांना प्राण गमवावे लागले असले तरी यंदा ४ मे पासून केदारनाथाची यात्रा सुरू केली जात असल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी जाहीर केले आहे. यात्रा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी सर्व उपाययोजना केली गेली आहे.

दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या भागात पुरेशी वाहने आणि जवान तैनात करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती ओढवलीच तर यात्रेकरूंना सुरक्षित हलविता यावे यासाठी एअरलिफ्ट करण्याची सुविधाही केली गेली आहे. चारधाम यात्रेच्या मार्गाच्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर केले जात आहे.

यात्रेची प्रत्यक्ष सुरवात २ मे रोजी होत असून या दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरे खुली होणार आहेत. त्यानंतर ४ मेला केदारनाथ तर ५ मे रोजी बद्रीनाथ मंदिर खुले होणार आहे. यंदा केदारनाथ साठी दररोज १ हजार भाविकांनाच दर्शन परवानगी दिली जात असून या सर्व भाविकांची बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन केले जाणार आहे.

Leave a Comment