उष्मांकाचे अज्ञान घातक

food
आपण काय खातो ? आपल्या हातात पडेल ते खातो. जे काही खात आहोत त्याचे परिणाम काय होतील याची आपल्याला काहीही माहिती नसते. सध्या पुर्‍या महाराष्ट्रात वडा पाव खाण्याची प्रचंड लाट आहे. केवळ शहरांतच नाही तर खेड्यांतही वडा पावचे गाडे लागलेले असतात आणि लक्षावधी लोक तिथे नियमाने वडा पाव खातात. या दोन खाद्यांचे परिणाम आपल्या प्रकृतीवर काय होतात याची कोणाला माहितीही नसते आणि ढोबळ मानाने माहिती असेल तर क्षिती नसते. जागतिक स्तरावर काम करणार्‍या एका संघटनेने या बाबत सखोल अभ्यास केला असून आपण खात असलेल्या अन्नाच्या उष्मांकाची माहिती नसल्यामुळे किती प्रकारचे रोग होतात आणि ते कसे कसे होतात याची सविस्तर माहिती दिली आहे. त्यातल्या त्यात कर्करोग, मधुमेह, ह्दयविकार यांचा उद्भव या अज्ञानातूनच होत असतो असे या अभ्यासात दिसून आले आहे.

वर्ल्ड कॅन्सर रिसर्च ङ्गंड या संघटनेने ब्रिटनमधील अनेक नागरिकांना ते खात असलेल्या पदार्थांची आरोग्य विषयक माहिती विचारली असता त्यातल्या बर्‍याच लोकांना काहीही माहिती नाही असे दिसून आलेच पण ज्यांना आपल्याला माहिती आहे असे वाटते त्यांची ती माहिती चुकीची आणि विपर्यस्त आहे असेही आढळले. पचनाला जड असलेल्या काही खास पदार्थांच्या उष्मांकाची माहिती आहे का असे विचारले असता केवळ ३२ टक्के लोकांनाच ती होती. दोन तृतियांश लोकांचे अज्ञान होते तर एक तृतियांश लोकांचे ज्ञान होते. पण हेे शंभर टक्के लोक ते पदार्थ चांगले पोट भरून खात होते. दोन तृतियांंश लोक अज्ञानाने खात होते. तर एक तृतियांश लोक सारे काही समजून खात होते.

या संबंधात एक पाहणी करून प्रश्‍नावलीही भरून घेण्यात आली. तिच्यातही हलके खाणे म्हणजे काय आणि चरबीविरहित खाणे म्हणजे काय याची माहिती कोणीही अचूकपणे दिली नाही. केळी खाल्ल्याने वजन वाढते हे केवळ २० टक्के लोकांनाच माहिती होते. १०० ग्रॅम केळ्यात ९५ उष्मांक असतात हे ८० टक्के लोकांच्या गावीही नव्हते. हजारो ब्रिटीशांनी नव वर्षाच्या पहिल्या दिवशी वजन कमी करण्याचा निश्‍चय केला. कारण त्यांचे वजन वाढत आहे आणि वाढलेल्या वजनाच्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. म्हणून अनेकांनी स्लीम होण्याचा निर्धार केला हे बरे झाले पण वजन नेमके कसे कमी करायचे आणि त्यासाठी काय काय खाणे टाळायचे याची माहिती त्यांना नाही. ती माहिती नसेल तर त्यांचे वजन कमी होण्याऐवजी वाढत जाणार हे अगदी नक्की आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment