आईस्क्रीम शीतपेये व्यवसायात तेजी

colddrink
गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ्याची वाढलेली तीव्रता आणि अल निनोच्या प्रभावामुळे उन्हाळा लांबण्याची निर्माण झालेली शक्यता देशातील आईस्क्रीम आणि शीतपेये उत्पादकांना लाभाची ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यंदा एप्रिलपासूनच या उत्पादनांचा खप प्रचंड वाढला असून व्यवसायात १० ते १२ टक्के वाढ झाली असल्याचे समजते. दरवर्षी मे महिना आईस्क्रीम व शीतपेये उत्पादनांसाठी विक्रीचा उच्चांक नोंदविणारा असतो. सीझनमधील एकूण विक्रीच्या ५० टक्के विक्री मे मध्येच होत असते. मात्र यंदा एप्रिलपासून विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे आणि हाच ट्रेंड जून जुलैपर्यंत सुरूच राहील असे संकेतही मिळत आहेत.

कोका कोला, अमूल, वाडिलाल, मदर डेअरी, पार्ले अॅग्रो या महत्त्वाच्या कंपन्यांचा व्यवसाय आत्ताच १५ ते २० टक्के वाढला आहे. उत्पादनांचा खप १०० टक्के होत असून या कंपन्यांनी बाजारात आणलेले छोटे पॅक अधिक लोकप्रिय ठरले आहेत. आयपीएलचे सामने आता भारतातच होत असल्याने प्रायोजक कंपनी पेप्सीही जोरदार व्यवसाय करत आहे. आईस्क्रीम कंपन्यांनी नवनवीन स्वाद बाजारात आणले आहेत आणि त्यांनाही चांगला प्रतिसाद असल्याचे अमूल, वाडिलाल कंपन्यांतील अधिकार्‍यांकडून सांगितले गेले आहे.

Leave a Comment