मोदींनी घेतले तिरूपती बालाजीचे दर्शन

balaji
तिरूपती- गुरूवारी म्हणजे आज सकाळी नरेंद्र मोदी यानी तिरूपती बालाजीचे दर्शन घेऊन तेथे पूजा केल्याचे समजते. मोदी पंतप्रधान होणार असे संकेत अनेक थरांतून मिळत असले तरी मोदींनी मात्र अनेक मंदिरांना भेटी देण्याचे व देवाचे आशीर्वाद घेण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.

निवडणुका मतदानानंतर भाजपला अनुकुल असलेली परिस्थिती, प्रचार माध्यमांची सर्वेक्षणे, विद्धान तज्ञांची मते, मोदींच्या सभांना होत असलेली अफाट गर्दी , ज्योतिषांची भविष्यवाणी ही सारी मोदीं पंतप्रधान होणार याची प्रचीती देणारी असल्याचे मानले जात आहे. मोदी आज आंध्रात पाच सभा घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी तिरूपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आहेत.