अकौंट हॅक करणार्‍या फेसबुक टूलचा लक्षावधींना फटका

facebook2_1

भारतात अलिकडेच फेसबुक युजरमध्ये विशेष लोकप्रिय झालेले ऑनलाईन हॅकिंग टूल युजरची फसवणूक करणारे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आपल्या मित्रमंडळींची अकौंट हॅक करण्याची सुविधा देणारे हे ऑनलाईन हॅकिंग टूल खुद्द युजरचीच सर्व माहिती हॅक करत असल्याने त्यापासून सावध राहण्याचा इशारा सिमेंटेकच्या सतनाम नारिंग यांनी दिला आहे. भारतात या प्रकारे सुमारे ५० हजार ते १ लाख फेसबुक युजरना याचा फटका बसला असल्याचेही सांगितले जात आहे.

फॉर एज्युकेशन परपज म्हणून आलेले हे टूल गुगल ड्राईव्हशी डॉक्युमेंटशी लिंक्ड आहे. या टूलसाठी एक कोडही आहे आणि आपल्या मित्रमंडळीची अकौंट हॅक करण्याची इच्छा असलेल्या युजरने तो ब्राऊजरच्या अॅड्रेस बारमध्ये पेस्ट करावयाचा आहे. त्यानंतर ज्याचे अकौंट आपण हॅक केले ते हॅक झालेले पाहण्यासाठी दोन तास वाट पाहायची अशी या टूलच्या वापराची पद्धत दिली गेली आहे. मात्र प्रत्यक्षात ज्यांनी हा कोड अॅड्रेस बारमध्ये पेस्ट केला त्यांचीच अकौंट हॅक होऊन त्यांची सर्व वैयत्तिक माहिती चोरी केली गेली जात असल्याचे सांगितले जात आहे. लिस्ट फॉलो करणे अथवा लाईक पेजेससाठी तुमचे अकौंटच या प्रकारात वापरले जाते. तुमचे मित्र नावे ट्रॅक करण्यासाठी जेव्हा अकौंट पाहतात तेव्हा हे स्कॅम आपोआप विस्तारत जात असते मात्र युजरच्या ते लक्षातही येत नाही.

२०११ मध्ये हे टूल प्रथम आले तेव्हा त्याच्या मूळ स्कॅमरला अतोनात यश मिळाले होते. भारतातील हॅकरनी या मूळ स्कॅमरच्या कोडमध्ये त्यांची स्वस्तःची पेजेस अॅड केली आहेत आणि त्यामुळे लाईक काऊंट वाढला आहे असेही नारिंग यांचे म्हणणे आहे. वर्षाच्या सुरवातीला ५० हजार ते १ लाख लाईक फॉलोअर इतकी प्रचंड ही संख्या आहे.त्यामुळे तुम्ही जर हे टूल वापरत असाल तर तुमचेच अकौंट हॅक होणार आहे हे लक्षात घ्या असाही नारिंग यांचा सल्ला आहे.