महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीला १० जागा?

मुंबईसह राज्यात झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील नेते बैचैन झाले असल्याचे वृत्त आहे. दिल्लीतील काँग्रेस हायकमांडने तर महाराष्ट्रात पक्षाला ८ पेक्षा जादा जागा मिळणार नाहीत असे स्पष्ट संकेत दिले असल्याचेही समजते.तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांची हार यंदा निश्चित मानली जात आहे. भाजपसाठी अनुकुल असलेले वातावरण आणि तुलनेने मनसेचा कमी झालेला प्रभाव यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी धोक्यात आल्याचे मानले जात आहे.

मुंबई, मराठवाडा, खानदेश भागात वाढलेला मतदानाचा टक्का कॉग्रेंसच्या मुळावर येणार आहे असे काँग्रेसच्या मुख्यालयातील पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा मुंबईतील मतदान पॅटर्नवर बारीक लक्ष ठेवले गेले होते. युवा मतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेले मतदान आणि बदल हवा ही त्यांची अपेक्षा तसेच उच्चमध्यमवर्गीयांनी मतदानासाठी लावलेल्या रांगा, काँग्रेसच्या पारंपारिक मतदारांची उदासीनता आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची निराशा अशी अनेक कारणे पाहता मुंबईत कॉग्रेस फक्त देवरांची जागा टिकवू शकेल असे संकेत मिळत आहेत. जादा मतदान संजय निरूपम, गुरूदास कामत, प्रिया दत्त आणि राष्ट्रवादीचे संजय पाटील यांना अडचणीचे ठरू शकणार आहे.

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ धोक्यात आहेत तेथे शिवसेना बाजी मारेल असा अंदाज आहे. मराठा समाजाने भुजबळांच्या विरोधात केलेले मतदान त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरेल असे सांगितले जात आहे. कोंकणात राष्ट्रवादीचेच सुनील तटकरे यांनी अमाप खर्च केला असला तरी तेथेही सेनेचे अनंत गिते यांचेच पारडे जड असल्याचे दिसून आले आहे. सिधुदुर्गातही राणे जिकलेच तर अतिशय कमी फरकाने जिंकतील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment